सामाजिक कार्यकर्ते हर्षल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त चष्म्यांचे वाटप

0

चाळीसगाव- शहरातील शास्त्रीनगर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते हर्षल चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर डीजे व पार्टी वर खर्च न करता प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची डोळे तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्त गट तपासणी शिबीर आयोजित केले होते या शिबिरात अडीचशे चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उमंग महिला समाज परिवाराच्या संपदा पाटील यांच्या हस्ते नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव नाशिकच्या तुलसी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील , नगरसेवक रवींद्र चौधरी, नगरसेवक नितीन पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, मंगेश चव्हाण , बेलगंगाचे माजी संचालक भैय्यासाहेब पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, नरेंद्र तेली, रामेश्वर चौधरी, भाजपा व्यापारी आघाडीचे किशोर रणधीर, प्रशांत चौधरी, उमंग महिला समाज परिवाराच्या डॉ.ज्योती पाटील, सुबोध वाघमारे, बंडू पगार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी महारू चौधरी, नीलेश मांडोळे, गणेश बच्छाव, राहुल मांडोळे, राजू चौधरी, प्रद्युमन शिंदे, योगेश चौधरी, शोभा वाघमारे, शिवराज पाटील, राकेश गोसावी, दिलीप चौधरी, तुषार पाटील, अजित राठोड, प्रशांत बच्छाव, प्रकाश बच्छाव, गणेश चौधरी, राजू पैठणकर, मोहित चौधरी, राहुल मांडोळे, विशाल चौधरी, निखिल चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy