सामाजिकशास्त्रे अभ्यास पद्धतीची पुर्नबांधणी गरजेची

0

जळगाव । सामाजिकशास्त्रे अभ्यास पध्दतीची पुर्नबांधणी होणे गरजेचे असून ती महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या धर्मविषयक विचारांवर आधारित व्हावी असे मत आतंरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकारक डॉ.गेल ऑम्वेट यांनी व्यक्त केले. त्या मूळजी जेठा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशन प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी विचारमंचावर बीजभाषक डॉ.व्हर्जिनियस खाका, प्रमुख पाहुणे म्हणून नजूबाई गावीत (नंदुरबार), मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार जाधव, सचिव डॉ.अरूण पौडमल, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील,प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, परिषदेच्या समन्वयक डॉ.जयश्री महाजन उपस्थित होत

पाश्‍चिमात्य देशातील वर्ग संकल्पना कालबाह्य
पुढे बोलतांना डॉ.गेल ऑम्वेट म्हणाल्या, आज सामाजिकशास्त्रे महात्मा फुले यांनी धर्माविषयी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात मांडलेले विचार तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथात नमूद केलेल्या धर्म संकल्पना त्याचबरोबर कार्ल मार्क्स यांनी धर्म संकल्पनेवर केलेले विवेचन या अनुषंगाने विकसित होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत पाश्चिमात्य देशातील वर्ग संकल्पनेवर आधारित सामाजिक शास्त्रे कालबाहय झाले असल्याचे स्पष्ट केले.

संशोधन पत्रिका, पुस्तकाचे प्रकाशन
भारतीय समाजशास्त्रात फुले, आंबेडकर आणि मार्क्स यांच्या धर्म विषयक विचारांवर पुर्नगठीत होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी परिषद स्मरणिका, संशोधन पत्रिका, वार्षिक दिनदर्शिका आणि पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नजूबाई गावीत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. तर बीजभाषणात डॉ.व्हर्जिनिअस खाक्का यांनी आदिवासीना प्रथम सुरक्षितता प्रदान करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आदिवासीं-संदर्भात लिखाण पूर्वग्रह दूषीत
सुरक्षा रक्षक प्रमुख पाहुण्या नजुबाई गावीत यांनी आदिवासीमध्ये जागृती करतांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे निर्देशनास आणून दिले. आदिवासी जगण्याचे वास्तव चित्रण झाले नसून बरचसे लिखाण पूर्वग्रह दुषीत असल्याचे सांगितले. त्यावर तटस्थपणे विचार करून नवसंशोधन करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ.जयश्री महाजन यांनी केले. डॉ.महेंद्रकुमार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रा.योगेश बोरसे तर आभार डॉ.अरूण पौडमल यांनी मानले.