साध्वी ज्ञानप्रभाजींचे भुसावळात आगमन

0

भुसावळ । जैन साध्वी डॉ. ज्ञानप्रभाजी आदी ठाणा 8 यांचे बुधवार 18 रोजी सकाळी 9 वाजता येथील नाहाटा महाविद्यालयाजवळ आगमन झालेे. यावेळी समाजबांधवांनी पूजन करुन त्यांचे स्वागत केले. कुर्‍हे पानाचे येथून त्यांचे आगमन झाले आहे. त्यांचे धार्मिक व आध्यात्मिक प्रवचन 21 पासून दररोज सकाळी 8.30 वाजेपासून 9.30 पर्यंत सुराणा साधना भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
शहरात 21 रोजी पासून साध्वी डॉ. ज्ञानप्रभाजी यांचे स्वागत करण्यासाठी व अमृतवाणी ऐकण्यासाठी बहुसंख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, भुसावळतर्फे करण्यात आले आहे.