साधूचा क्षण,अन्नाचा कण हा मानवी जीवनात खूप मौल्यवान असतो!

0

जळगाव : भारतीय संस्कृती महान आहे. भारतीय संस्कृती आणि मर्यादा समजून घेऊन ती आत्मसात करा. तसेच साधूचा क्षण आणि अन्नाचा कण हा जीवनात खूप मौल्यवान असतो. असे विचार कथासम्राज्ञी साध्वी देवकन्या सुगनाबाईसा (दीदी) यांनी श्रीमद् देवी भागवत संगीतमय कथेत निरुपणाद्वारे मांडले. सागर पार्क येथे देवी भागवत कथा सुरु आहे. रविवारी कथेचा शेवटचा दिवस होता. संध्या वर्णन, गायत्री महिमा, संध्या तर्पण आणि सायंसंध्येच वर्णन तसेच दिव्याचे महत्व या विषयावर आज प्रवचन झाले.

गुणांबद्दल अहंकार बाळगू नका,दोषाबद्दल तिरस्कार करू नका
कथाकार दीदी म्हणाल्या, आपली पृथ्वी सात खांबांवर टिकली आहे.ते खांब आहेत, गोमाता, देव, आयाचक ब्राह्मण, पतिव्रता स्त्री, सत्पुरुष , दानशूर आणि निर्लोभी. .सुगनादेवीसा दीदी मधुर वाणीद्वारे प्रवचनात पुढे म्हणाल्या ,वेळ, सत्ता,संपत्ती आणि शरीर साथ देवो अगर न देवो परंतू चांगला स्वभाव,, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम साथ देतात. त्या पुढे म्हणाल्या, गुणांबद्दल अहंकार बाळगू नका व दोषाबद्दल तिरस्कार करू नका. काल सायंकाळी आरती सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम , माजी महापौर विष्णू भंगाळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सुनील झवर,आ.राजूमामा भोळे आदींच्या हस्ते झाली.

मुक्तीची अपेक्षा करणार्‍यांनी सत्संग करावा
कथाकार सुगनाबाईसा (दीदी)पुढे म्हणाल्या, पर्वत, नद्या, जलाशय, मंदिर यांची महिमा भारतीय संस्कृतीत अगाध आहे,असे सांगून निसर्गकन्या बहिणाबाईही अशिक्षित होत्या मात्र आपल्या काव्याद्वारे त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले. झाशीची राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर,यांच्या कार्याची महती सांगून गायत्रीची उपासना काशी करावी त्याबद्दल महत्व सांगितले..तसेच पूजनाचे महत्व याचप्रमाणे , जोपर्यंत तुळशीपत्र आपण जेवणात ठेवणार नाही, तोपर्यंत ते जेवण मांसाहाराच्या समान असते. तसेच मुक्तीची अपेक्षा करणार्‍यांनी सत्संग करावा. असे कथाकार दीदींनी वेगवेगळे उदाहरणे देऊन विषद केले. बाके बिहारी मुझे देना सहारा, कही छूट जाये ना दामन तुम्हारा हे कृष्ण भजन कथाकार दीदींनी गायल्यावर अनेक भक्तगणांनी नृत्याचा ठेका धरला .

सजीव देखावा सादर
सेवा समितीतर्फे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांतर्फे कथाकार दीदींना कृषी संस्कृतीचे प्रतिक देखण्या बैलगाडीचे प्रतिक भेट देण्यात आली. तसेच श्रीराम फौंडेशन तर्फे अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिमा भेट देण्यात आली. दीदींचे गुरु महंत शीतलाईनाथ यांनी उद्बोधन केले. रविवारी भगवान शंकराला अन्नपूर्णा देवीने भिक्षा वाढल्याचे सजीव दृश्य साकारण्यात आले. यात कल्पना सोनी आणि तनु अग्रवाल यांनी हा देखावा सादर केला. या सुंदर देखाव्याला भक्तगणांनी दाद दिली. सोमवारी हवन आणि पूर्णाहुती चा कार्यक्रम सकाळी 9 ते 10 या वेळात होईल. भक्तांनीलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.