सात लाखांचा शासकीय धान्याचा अपहार : भुसावळात तत्कालीन प्रांताधिकार्‍यांसह चार तहसीलदारांविरोधात गुन्हा

Misappropriation of government grain worth seven lakhs in Bhusawal : Case against four tehsildars along with the then provincial governor भुसावळ : शहरातील शासकीय धान्य गोदामात धान्याचा सात लाख 27 हजार 244 रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह चार तहसीलदार आणि गोदाम व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने भुसावळ शहरासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

रेशनच्या धान्याच्या साठ्यात आढळली होती तफावत
भुसावळातील गोदामामध्ये 20 मे 2020 च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशापूर्वी सरकारने दिलेल्या रेशन धान्याच्या साठ्यात 391.92 क्विंटल रेशनचे धान्य यात गहू, साखर, ज्वारी यात सुमारे सात लाख 27 हजार 244.17 रुपयांचा संगनमताने वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी गैरप्रकार केला. म्हणून या प्रकरणी अ‍ॅड.आशिष प्रमोद गिरी (रा.काळा घोडा, मुंबई) यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद न्यायालयाकडून प्राप्त झाल्यावर तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात, बोदवड येथील तत्कालीन तहसीलदार रवींद्र जोगी, प्रभारी तहसीलदार एस.यु.तायडे, प्रांताधिकारी श्री कुमार चिंचकर, तत्कालीन गोदाम व्यवस्थापक आर.एल.राठोड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे पुढील तपास करीत आहे.