सातपुड्यात शिकार्‍यांचा गोळीबार : पोलिसांकडून चौकशी

यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या यावल तालुक्यातील करंजपाणी या दुर्गम भागात परप्रांतीय शिकार्‍यांनी गस्तीवरील वनरक्षकांना पाहताच हवेत गोळीबार केला असून या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. करंजपाणी या परीमंडल कक्ष 03 क्रमांक 104 मध्ये दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता मागील चार वर्षापासुन वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ हे आपले सहकारी लेदा सीताराम पावरा, काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी, वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र लंगडा आंबा क्षेत्रात गस्त घालत असताना त्यांना शिकारी नजरेस पडले मात्र शिकार्‍यांनी भीतीपोटी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात . वनरक्षकांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या टोळक्याने ळ काढला. यावल पोलिसात विजय गोरख शिरसाठ वनक्षक करंजपाणी यांनी अज्ञात शिकार्यांच्या विरोधात फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून गोळीबाराचा तपास
या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक विनोद खांडबहाले व पोलिस अंमलदार सुशील घुगे, भुषण चव्हाण, असलम खान हे करीत आहेत.