साजिद खानवरील आरोपानंतर अक्षय कुमारकडून ‘हाऊसफुल ४’ची शुटींग थांबविण्याची मागणी

0

नवी दिल्ली- दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारने साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे शुटींग तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. अक्षय भूमिका साकारत असलेल्या ‘हाऊसफुल ४’ चा दिग्दर्शक साजिद खान आणि याच चित्रपटात काम करणाऱ्या नाना पाटेकर या दोघांवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप आहेत त्यामुळे अक्षय कुमार यांनी ही मागणी केली आहे.

मनोरंजन विश्वात काम करणारी महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल अक्षयनं घेत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

Copy