सागर पार्कजवळ मोटारसायकलींची समोरासमोर धडक

0

जळगाव । शहरातील सागर पार्कजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होवून अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात अपघातांच्या मालिका सुरूच असल्याने त्यांना आळा कधी लागणार असा प्रश्‍न आता उपस्थित व्हायला लागला आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल येथील रहिवासी रघूनाथ जयराम चव्हाण (वय-50) हे मोटारसायकल क्रं. एम.एच. 19. एएस. 1215 ने घरी जात होते. त्याच दरम्यान गौतम दशरत सरदार हे मोटारायकल (क्रं.एमएच.19.एके.3314) ने आकाशवाणी चौफुलीकडे जात होते. यावेळी दोघेही सागरपार्कसमोरून जात असतांना त्यांच्या मोटारसायकली समोरा-समोर धडकल्या. या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार फेकले गेले. मोटारसायकली धडकताच मोठा आवाज झाल्याने ये-जा करणार्‍या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात रघूनाथ चव्हाण व गौतम सरदार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर प्रकृति देखील चिंताजनक असल्याचे समजते.