साक्री येथे चंदू चव्हाण यांचा नागरी सत्कार

0

साक्री । भारतीय जवान चंदू चव्हाण हा पाकिस्तानातून सुखरूप मायदेशी परत आल्याने साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाद्वारा सत्कार करण्यात आले आहे. सोमवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीची सांगता सायंकाळी 6 वाजता राजे लॉन्स येथे होईल. यानंतर मा.ना. सुभाष भामरे व जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्य एस. यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, तहसिलदार संदिप भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या जाहीर सत्काराला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.