Private Advt

साक्री न.पं.च्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

साक्री। येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक आरक्षण काढण्यात आले. लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. यावेळी सर्वसाधारण प्रभाग महिलांसाठी प्रभाग क्र.2,5,7,11,16, राखीव तर 1, 9,10,13 ही पुरुषांसाठी राखीव निघाले आहेत. ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्र. 6 व 14 तर प्रभाग क्र.12 व 17 हे पुरुषांसाठी राखीव निघाले आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, ओएस सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गटनेते ज्ञानेश्वर नागरे, पं.स.चे उपसभापती अ‍ॅड.नरेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, पं.स.चे माजी उपसभापती विजय भामरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बापू गिते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, ओबीसी तालुकाध्यक्ष महेंद्र देसले, स्वप्नील भावसार, याकुब पठाण, श्रीकांत कार्ले, गोटू जगताप यांच्यासह राजकीय, सामाजिक, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर घरटे, जुबेर शाह, पाठक यांनी सहकार्य केले.