Private Advt

साक्रीतील भाजपाचे निरपराध कार्यकर्त्यांची नावे खोट्या गुन्हातुन वगळण्यात यावी : बबनराव चौधरी

शिरपूर : धुळे जिल्ह्यातील साक्री नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया दि.१९ जानेवारी रोजी नुकतीच पार पडली. यात भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाले सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा दारुण पराभव झाला. याचा राजकीय वचपा काढण्यासाठी सुडबुध्दीने श्रीमती माया शिवाजी पवार वय ४० वर्ष रा. लोकमान्य नगर, साक्री जि. धुळे यांनी भाजपाचे पदाधिकारी मनिष गिते, रमेश सरक, उत्पल्ल नांद्रे सह ५ ते ६ कार्यकर्त्यांविरुद्ध साक्री पोलिसात खोटया खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

मयत महिलेचे प्राथमिक शवविच्छेन पाठविण्यात आल्यानुसार मयताचे कॉरेमिक लंबकडे पाठविण्यात यावे. सदर घटनेची चौकशी रिपोर्ट सी. बी. आय. किंवा तत्सम यंत्रणेमार्फत करण्यात यावी व भाजपाचे निरपराध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात यावी अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी येथील भाजपा कार्यालयात आ. काशिराम पावरा यांचा प्रमुख उपस्थित झालेल्या पक्ष बैठकीतुन केली आहे.

यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, शिरपूर पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, शिरपूर मर्चंट बॅन्क चेअरमन प्रसन्न जैन, शिरपूर पिपल्स बॅन्क संचालक संजय चौधरी, खंडेराव बाबा संस्थान उपाध्यक्ष संजय आसापुरे, शिरपूर भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहर भाजपा सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, उपाध्यक्ष मुकेश पाटील, चिटणीस राधेश्याम भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, नितीन राजपुत, दिनेश पाटील, राज सिसोदिया, अमोल पाटील, अनिल पाटील, श्रीकृष्ण शर्मा, राजुलाल मारवाडी, रफीक तेली, रमेश चौधरी, जयवंत पाटील, लोटन पाटील, प्रेमसिंग राजपुत, अजिंक्य शिरसाठ, मोहन शिंपी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.