साकेगाव वाघुर शिक्षण प्रसारक मंडळावर दिलीपसिंग पाटील यांचे वर्चस्व कायम

0

साकेगाव- वाघुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दिलीपसिंग पाटील यांच्या नेतृत्वातील कार्यकारी संचालक मंडळातील सभासदांची सर्वानुमते हात उंचावून बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी दिलीपसिंग पाटील, रामदास पाटील, भादू पाटील, रामदास खडके गुरुजी, वामन कचरे, गोपाळ पाटील, संजय गोविंदराव पाटील, पोपटसिंग पाटील, प्रवीण कुमार पाटील आदी सभासदांना हात उंचावून सदस्यांनी बिनविरोध घोषित केले.

45 सदस्यांचे दिलीप पाटील यांच्या कमेटीला मतदान
प्रसंगी वाघूर शिक्षण प्रसारक मंडळाचे एकूण 57 पैकी 45 सभासदांनी दिलीपसिंग पाटील यांच्या कमिटीला मतदान केले. यशवंत रामदास वाघोदे यांनी कार्यकारणीची सूचना मांडली व अनिल पुंडलिक पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. निवडीनंतर दिलीपसिंग पाटील यांच्या गटाने जल्लोष केला. त्यांचे सरपंच अनिल पाटील, कृउबा चे माजी सभापती संजय पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, आनंद ठाकरे, माणिक पाटील, सुभाष कोळी, दिगंबर पाटील, संतोष भोळे, अनिल सोनवाल, गजानन कोळी, बळीराम सपकाळेंसह उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Copy