साकेगावातील वाघूर पुलावरून पडल्याने भुसावळच्या तरुणाचा मृत्यू

0

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला दिली धडक : मित्र जखमी : आरोपीला चालकाला अटक

भुसावळ : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला धक्का दिल्यानंतर दुचाकीस्वारामागे बसलेल्या तरुणाचा तोल जावून तो साकेगाव येथील वाघुर नदीच्या तुटलेल्या कठड्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दिड वाजता ही घटना घडली. सतीश रामचंद्र कुकरेजा (32, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयत युवकाचे नाव आहे तर या अपघातात दुचाकीस्वाराचा मित्र प्रदीप तलरेजा हादेखील जखमी झाला आहे. या घटनेने भुसावळ शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

जळगावी जाताना गाठले मृत्यू
प्रदीप तलरेजा यांचे मोबाईलचे तर सतीश कुकरेजा यांचे संगणकाचे जळगावात दुकान असून दोघे मित्र दुचाकी (एम.एच.19 बी.टी.4106) ने जळगावकडे निघाले असताना साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर ओव्हरटेक करून भरधाव वेगात मुंबईकडून कोलकत्त्याला जाणार्‍या भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर (डब्ल्यूबी 33 बी 3539) ने दुचाकीच्या हॅण्डलला धक्का दिल्याने सतीश हा कठडे नसलेल्या भागातून थेट नदीपात्रात कोसळल्याने त्याचा मृत्यू ओढवला तर मित्र प्रदीप तलरेजा हा जखमी झाला आहे. अपघाताचे वृत्त कळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी धाव घेतली. प्रदीप तलरेजा यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात टेम्पो ट्रॅव्हलर चालक तौसीक पबीर मजुमदार (रा. वेस्ट बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.