साकेगावच्या श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा

0

जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नाला ; 22 रोजी दत्त जयंती होणारी साजरी

भुसावळ- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनांतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हजारो वर्षापूर्वीची श्री आश्रम ऋषी महाराज यांची समाधी असून याठिकाणी सन 1986 साली दत्तमंदिर बांधकामाला सुरुवात होऊन सन 1988 साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. वर्षानुवर्षेपासून दत्त जयंती, गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केली जाते. दत्तजयंतीला सकाळी महापूजा, होमपूजन, दुपारी आरती व दिवसभर महाभंडारा आयोजित केला जातो. जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक या ठिकाणी येतात. सप्टेंबर 2017 ला ग्रामसभेत ठराव होऊन मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परीषदेकडे सादर करण्यात आला होता. 1 जानेवारी 2018 रोजी जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी शिफारस पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला. 3 ऑक्टोबर 2018 च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मंजूर होऊन गुरुदेव दत्त मंदिराला क दर्जा मिळाला आहे. दरम्यान, 22 डिसेंबरला साजरी होणारी दत्तजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Copy