साकेगावच्या व्यावसायीकाला शेतानजीक लुटले

तीन संशयीतांनी दुचाकी अडवत डोळ्यात मिरची पूड टाकून 75 हजारांच्या रोकडसह पाच तोळे वजनाचे दागिने घेवून पोबारा

भुसावळ : दुचाकीने शेताकडे निघालेल्या साकेगावच्या व्यापारी तथा शेतकर्‍याला साकेगाव शिवारात सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दरोडेखोरांनी मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत लुटारूंनी 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला. दरम्यान, तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एकाला ओळखले असून त्याचे नाव सोनू पांडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे.