साकळी शेत-शिवारातून दुचाकी लंपास

Two-wheeled lampas from Sakli Shet-Shiwar यावल : तालुक्यातील साकळी शेत-शिवारातून दुचाकी लांबवण्यात आली. हा प्रकार निदर्शनास येतात यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात गुन्हा
साकळी येथील जीवन यादव बडगुजर यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते साकळी शेत-शिवारातील शेख आमीर शेख हुसेन यांच्या शेत गट क्रमांक 556 मध्ये गेले असता शेताच्या बाहेर त्यांनी त्यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.बी. 0054) ही लावली असता चोरट्यांनी संधी साधली., यावल पोलिसात अज्ञात चोरट्या विरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.