साकरीच्या जवानाचे झाशीत हृदयविकाराने निधन

0

भुसावळ- तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व रेल्वेत इंजिनिअर पदावर असलेला तरुणाचे झाशी येथे मिलिटरी ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्याचे निधन झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. भूषण उर्फ संदीप युवराज कोल्हे (31) असे मयत जवानाचे आहे. संदीप हा गेल्या 16 दिवसांपासून झाशी येथे 970 इंजिनिअर बटालियनमध्ये मिलिटरीचे प्रशिक्षण घेत होता. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्यास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. साकरी येथे याबाबतची माहिती कळवल्यानंतर शोककळा पसरली. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आणल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिण, वहिनी असा परीवार आहे.

जवानाच्या मृत्यूने शोककळा
रेल्वेत नोकरीत असलेल्या विविध पदावरील कर्मचार्‍यांना मिलिटरी जाण्याची आवड असल्यास वर्षातून एकदा झाशी येथे प्रशिक्षण दिले जाते व या प्रशिक्षणासाठी भूषण कोल्हे हा 16 दिवसांपूर्वी रवाना झाला होता. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यत करण्यात आली. तिरंग्यात लपेटलेला मुलाचा मृतदेह पाहताच आईने टाहो फोडला. याप्रसंगी सैन्य दल विभागातर्फे मानवंदनाही देण्यात आली.

Copy