साईटपट्ट्यांमुळे अपघातास आमंत्रण

0

भडगाव । तालुक्यातील रस्त्यांच्या साईडपट्याची दयनीय अवस्था झाली असून संबंधित विभागाचे दुर्लक्षामुळे दुचाकी धारकांना अपघाताचे आमंत्रण देण्याच्या स्थितीत झालेले आहेत.

या साईडपट्याची माती मुरुम टाकून भराव करण्याची मागणी दुचाकी वाहनधारकांकडून होत आहे. एरंडोल, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, तरवाडे रस्ता, वाडे गुढे या गावाकडे जाणार्‍या रस्त्यांची साईडपट्या बर्‍याच ठिकठिकाणी खोलवर गेलेल्या आहेत. यामुळे दुचाकीधारक व अन्य छोटे वाहनधारकांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.