Private Advt

सांगवी खुर्द येथे महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द येथे महिलेला पाहून लघूशंका करीत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला पोलिसांनी केली अटक
पीडीतेच्या फिर्यादीनुसार सांगवी खुर्द येथे निमगाव रस्त्यावरून शनिवारी सकाळी त्या जात असताना संशयीत आरोपी चंदन पंडीत कोळी याने महिलेकडे पाहून लघूशंकेसाठी उभा राहिला व महिलेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य त्याने केले. जाब विचारल्यानंतर महिलेला शिविगाळ करण्यात आली. आरोपीविरोधात तक्रार दाखल करताच त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे.