Private Advt

सांगवी खुर्दला दोन गट भिडले : तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी

मागील गुन्ह्याबद्दल बोलणे ठरले निमित्त ; परस्परविरोधी फिर्याद

यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द येथे मागील गुन्ह्याबद्दल टोचून बोलण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. त्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण 18 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले.

यावल पोलिसात गुन्हा
सांगवी खुर्द येथील सुनील रामदास कोळी यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री त्यांचा लहान मुलगा लखन कोळी हा मुंजोबाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गावात गेला. त्यावेळी रस्त्यात शुभम प्रमोद धनगर, नीलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर यांनी मागील एका गुन्ह्यात आमचे लोक सुटून आले तुमच्याने काहीच झाले नाही, असे सांगतले. त्याचा जाब विचारल्यावर या चौघांसह संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर व बबलू कैलास धनगर या आठ जणांनी लखनला जबर मारहाण केली. सुनील कोळी व त्यांचा मुलगा तेथे गेले व भांडण सोडवून जखमी लखन यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यास मारहाण करणार्‍या आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सूर्यवंशी करत आहे.

दुसर्‍या गटाच्या फिर्यादीवरून 10 जणांवर गुन्हा
संजय वसंत धनगर (सांगवी बुद्रुक) यांनीही फिर्याद दिली. त्यानुसार वरील कारणावरून झालेल्या हाणामारीत लखन कोळी, सुनील कोळी, सागर कोळी, चंद्रकांत कोळी, दिलीप कोळी, ताराचंद कोळी, भागवत कोळी, रवींद्र पोपट कोळी, विकास गणेश पाटील व महेंद्र भगवान कोळी या 10 जणांविरुद्ध फिर्यादी संजय धनगर, प्रमोद धनगर, कैलास धनगर यांना मारहाण करून जखमी केले म्हणून दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.