सांगवीत दारू बंदी न झाल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा

0

दारू बंदी विभागासह यावल पोलिसांचे दुर्लक्ष : संतप्त रणरागिणींनी दिला मोर्चाचा ईशारा

यावल- तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावी अवैध दारूची विक्री सर्रास होत असून यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या 17 ऑगस्ट 18 रोजी च्या ग्रामसभेत ग्रामस्थ व महिला वर्गांनी याबाबत दारूबंदीच्या संदर्भात आक्रोश केला होता. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या ठरावं अशी दारूबंदी विभाग व यावल पोलीस स्टेशन यांच्याकडे ठराव पाठवूनही कुठलीही कारवाई झालेली नाही. येत्या आठ दिवसाच्या आत गावातील दारूबंदी न झाल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यालयावर गावातील महिला वर्ग व ग्रामस्थ धडक मोर्चा नेतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तर ग्रामपंचायतीचा ठराव देऊनही जर संबंधित विभाग कारवाई करत नसेल तर रस्त्यावरच उतरावे लागेल असाही इशारा त्यांनी दिला आहे याबाबत सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच तनुजा भंगाळे यांनी पोलीस स्टेशनला स्मरणपत्र ही दिलेले आहे मात्र याकडे कुठलेही लक्ष दिले गेले नाही.

Copy