Private Advt

सांगवीच्या विद्यार्थिनीचा दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विनयभंग ; पोस्कोन्वये गुन्हा

यावल : तालुक्यातील सांगवी येथील शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचे इयत्ता 11 वीतील दोन विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह फोटो काढून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावल पोलिसात गुन्हा
सांगवी बुद्रूक येथील शाळेतील अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार ती मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेच्या पायरीवर सावलीमध्ये बसलेली होती. त्यावेळी डोंगरकठोरा गावातून इयत्ता 11 वीमध्ये शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी तेथे आले. आणि त्यांनी या विद्यार्थिनीचा विनयभंग करीत आक्षेपार्ह फोटो काढत मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे सांगितला. तेव्हा मोबाईलमधून फोटो डिलीट करण्यात आले. मात्र विद्यार्थिनीच्या आई-वडील व नातेवाइकांनी या बाबत यावल पोलिस ठाणे गाठून पीडित विद्यार्थिनीने फिर्याद दिली. तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करत आहेत.