सांगवीच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

सावदा : लोहारा रस्त्यावर भरधाव दुचाकीने उडवल्याने सांगवीच्या पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजु शब्बीर तडवी, (28, सांगवी, ता.यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दुचाकीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू
राजू शब्बीर तडवी (28) हा तरूण आपल्या पत्नी रजीना तडवी यांच्यासोबत सांगवी येथे वास्तव्याला आहे. राजू तडवी यांचे साडू फिरोज तडवी हे रावेर तालुक्यातील गौरखेडा येथे राहतात. दरम्यान राजू हा शनिवार, 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी गौरखेडा येथे पत्नी रजनीसोबत आला असता सायंकाळी साडेसात वाजता जेवण झाल्यानंतर साडूचा मुलगा आदिल फिरोज तडवी सोबत लोहारा रस्त्यावर फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एम.पी.10 एन.डी.2438) ने राजू तडवी याला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू तडवी हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार दुचाकी सोडून शेजारील शेतातील केळीच्या बागेतून पसार झाला. जखमी अवस्थेत राजूला फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याबाबत आदिल फिरोज तडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.