सांगवीचे पीएसआय दीपक वारे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

0

शिरपूर: तालुका पोलीस स्टेशन सांगवी पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक दीपक वारे यांना महाराष्ट्र राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यात विशेष सेवा बजावून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृह विभागातर्फे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील नक्षलग्रस्त भागात विशेष सेवा बजावल्याबद्दल केंद्रीय गृह विभागातर्फे राज्यातील 1 हजार 172 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आंतरिक सुरक्षा पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यात जिल्ह्यातील तीन अधिकारी व कर्मचार्‍यांना आंतरिक सुरक्षा पोलीस पदक जाहीर झाले आहे.त्यात सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे गजानन गोटे आणि अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक गणेश देवरे यांचा समावेश आहे

सांगवी पोलीस स्टेशन येथे दीपक वारे हे उपनिरीक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. त्यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाल्याने तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पीएसआय नरेंद्र खैरनार व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Copy