सहा बॉलमध्ये सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम

0

मेनबर्न : ऑस्ट्रेलियाच्या गोल्डन पॉईंट क्रिकेट क्लबतर्फे खेळताना अॅलेड कॅरीने सहा बॉलमध्ये सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करण्याची कामगिरी केली. त्याने एकाच षटकात सहा फलंदाजांना बाद केले. 29 वर्षीय कॅरीला ईस्ट बेलार्ट संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या आठ षटकात एकही विकेट मिळाली नव्हती. पण नवव्या षटकात त्याने कमालच केली. प्रत्येक गोलंदाजांचे स्वप्न असते अशी कामगिरी त्याने केली.

नवव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर फलंदाज स्लिपमध्ये झेलबाद झाला. तर विकेटकीपरच्या हातात झेल देऊन पुढचा फलंदाज माघारी परतला. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज पायचीत झाला. संघाचे सर्व खेळाडून कॅरीच्या यशाचं जल्लोष करत होते. पण खेळ अजूनही बाकी होता. अॅलेड कॅरीने पुढच्या तीन बॉलवर तीन फलंदाजांना बोल्ड केलं. परिणामी ईस्ट बेलार्ट संघाचा डाव अवघ्या 40 धावांवरच आटोपला. त्यावेळी मैदानात थोडेच प्रेक्षक उपस्थित होते.