सहाय्यता समिती बैठकीमध्ये 11 प्रस्ताव मंजूर

0

धुळे । शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली. या बैठकीत 11 पात्र प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सदस्य जे. यू. ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, तहसीलदार दत्ता शेजूळ (महसूल), संदीप भोसले (साक्री), अमोल मोरे (धुळे), रोहिदास वारुळे (दोंडाईचा), जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, जिल्हा पोलिस विशेष शाखेचे निरीक्षक अनिल वडनेरे उपस्थित होते. या बैठकीत 14 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यापैकी 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर दोन प्रस्ताव अमान्य करण्यात आले. तसेच एक प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला.