सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा

0

भुसावळ : महानिर्मितीतर्फे सहाय्यक अभियंतापदाच्या परिक्षेकरिता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे यशस्वीरीत्या अर्ज सादर केलेला आहे अशा उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा 28 व 29 रोजी अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, धुळे, जळगाव, कोल्हापूर, कोपरगाव, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवीमुंबई, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, यवतमाळ इत्यादी ठिकाणी घेण्यात येत आहे.

परिक्षार्थ्यांना पाठविले प्रवेशपत्र
उमेदवारांनी, महानिर्मितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षेकरीताचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, ठिकाण व वेळेबाबतची माहिती  संकेतस्थळावरून घ्यावी. सहाय्यक अभियंता ऑनलाईन परीक्षा एकूण 180 गुणांची असून यामध्ये कल चाचणी प्रश्नमध्ये 60 प्रश्न असून त्याकरीता 60 गुण तर शैक्षणिक अर्ह्तेशी संबंधितमध्ये 60 प्रश्न असून 120 गुण राहणार आहेत. ऑनलाईन परीक्षेत चुकीच्या उत्तरांकरिता गुण कपात करण्याची पद्धत अवलंबिली जाणार नाही. उमेदवारांच्या माहितीकरिता, सराव प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम माहिती, महानिर्मितीच्या वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेकरिता तात्पुरते पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता युझर नेम व पासवर्ड त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेला आहे तसेच ऑनलाईन अर्जात भरलेल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र देखील पाठविण्यात आले आहे.