सहायक फौजदार ठाकूर दोन हजारांचे आरोपी!

0

चोपडा। गुरे वाहतूक करणारे चार चाकी वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतांना सहायक फौजदार भास्कर राजधर ठाकूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरे वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले होते.

हे वाहन तक्रारदाराच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते तरीही ठाकुर यांनी ते सोडविण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची मागणी केली होती.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर आज ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ सापळा रचला होता. तक्रारदाराकडून लाच घेतांना ठाकूर यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाकूर यांना चौकशीसाठी विश्रामगृहात नेण्यात आले.