सहकार्याने नंदुरबार जिल्ह्याला हागणदारी व कुपोषण मुक्त करू

0

नंदुरबार । नं दुरबार जिल्ह्याला हागणदारी व कुपोषण मुक्त करण्याकारिता फक्त शासन एकट काही करू शकत नाही. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जि.प अध्यक्षा रजनी नाईक यांनी केले. त्या तालुक्यातील निजामपूर गावात भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आरोग्य विभागाच्या सहयकार्याने आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होत्या. माता व बाल आरोग्य तसेच किशोरवयीन आरोग्य विषयावर या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवजात बालकांची आरोग्य तपासणी
यावेळी सिकलसेल, हिमोग्लोबीन, एच.आय.व्ही. तपासणी तसेच गरोदर माता व नवजात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी औषधांचे मोफत वाटप सुद्धा करण्यात आले. तत्पूर्वी गावातून विद्यार्थ्यांची एक प्रचार फेरी आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सदाशिव मलखेडकर, आरोग्य विस्तार अधिकारी आर डी गावित, ग्रामसेवक एस टी शिंपी, आंगणवाडी पर्यवेक्षिका एस व्ही कोकणी, मुख्याध्यापक नंदकिशोर सोनावणे, आश्रमशाळेचे शिक्षक के जी पाटील, अरुण पाटील, एस इ कुरेकर ,आरोग्य सेवक व सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वच्छ भारत अभियानाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

स्वच्छतेशिवाय आरोग्य राखता येणार नाही
जि प अध्यक्षा पुढे म्हणाल्या की स्वच्छतेशिवाय आरोग्य राखता येणार नाही. सभापती सविता गावित म्हणाले की समाज बांधवानी आपल्या मुली व मुलांचे लग्न 18 व 21 वर्षानंतर करावे जेणेकरून माता मृत्यू प्रमाण कमी करू शकतो. गटविकास अधिकारी वाळेकर या वेळी म्हणाले की शासनातर्फे माता व बाल आरोग्यावर आधारित अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा तळागळातील लोकांसमवेत समाजाच्या सर्व वर्गांनी फायदा करून घेतला तर निश्चितच एक संपूर्ण निरोगी समाजाचे स्वप्न साकार होईल. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजीव वळवी यांनी जननी सुरक्षा योजना, जननी व शिशु सुरक्षा कार्यक्रम, लसीकरण, मातृत्व अनुदान योजना सहित विविध राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमांची माहिती दिली. या वेळी बोलतांना स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षाली गावित यांनी गरोदर मातांना आरोग्याची त्रिसूत्रीची माहिती दिली.

या अधिकार्‍यांची उपस्थिती
या वेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सविता गावित, जि प सदस्या मायावती गावित, सहायक जिल्हाधिकारी निमा अरोरा, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, क्षेत्रीय प्रचार संचलनालयाचे अधिकारी पराग मांदळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजीव वळवी, सरपंच रेवा वसावे, उपसरपंच मालसिंग वसावे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस व्ही पिंपळसे, पंचायत सदस्या सुनीता गावित, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस बी महाजन, स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षाली गावित, डॉ. वंदना मावची, बालरोग तज्ञ डॉ. युवराज पराडके, इत्यादी उपस्थित होते.