सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचे पाचशेहून अधिक रूग्ण

0

जळगावात सर्वाधिक १४१ रूग्ण : एकुण रूग्ण १५९६२

जळगाव: जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी पाचशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. आज ५७१ नविन रूग्णांची भर पडली असुन
सर्वाधिक जळगाव शहरात १४१ रूग्ण आढळले आहे. एकूण रुग्णसंख्या १५ हजार ९६२ झाली आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. बुधवारी नव्याने ५७१ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर १४१, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ २८, अमळनेर १७, चोपडा ५६, पाचोरा १४, भडगाव ९, धरणगाव ४०, यावल १७, एरंडोल १७, जामनेर ३०, रावेर १६, पारोळा ३०, चाळीसगाव ७८, मुक्ताईनगर २१, इतर जिल्ह्यातील १० अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ८ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यात २, चोपडा, पाचोरा, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी
दिली आहे.

Copy