सलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

0

जळगाव शहरात सर्वाधिक 114 रूग्ण

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 443 रूग्ण आढळून आले असुन 8 रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 45 हजार 872 झाली आहे. सर्वाधिक 114 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे 783 रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत. आज गुरुवारी सलग आठव्या दिवशी          नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना मुक्त      होणाााऱ्यांची    संख्या अधिक     राहीली आहे.

जिल्ह्यात नव्याने 443 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर 114, जळगाव ग्रामीण 6, भुसावळ 53, अमळनेर 41, चोपडा 43, पाचोरा 14, भडगाव 10, धरणगाव 7, यावल 25, एरंडोल 12, जामनेर 19, रावेर 33, पारोळा 11, चाळीसगाव 38, मुक्ताईनगर 4, बोदवड 12 इतर जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर तालुक्यात 2 , जळगाव शहर, जळगाव ग्रामीण , मुक्ताईनगर, भुसावळ, चाळीसगाव, रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy