सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत

0

नंदुरबार। शासन निर्णयानुसार 42 खेळाव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत बाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडीया यांच्यावतीने सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात शासनाच्यावतीने झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन झाले होते.

यात नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनीही सहभाग नोंदविला आहे. परंतू शासन निर्णयानुसार 42 खेळाव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. चौकशीतच खोटेपणा उघड या संदर्भात नंदुरबार अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील व क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांना जिल्ह्यातील खेळाडूंनी निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवून प्राविण्य मिळविले आहे. तरी आम्हास राज्याचे शिक्षण मंत्री मा.विनोद तावडे यांनी इतर खेळाडूंप्रमाणे सवलतीचे गुण देवून आमच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी निवेदन देतांना ममता ङ्गटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्‍विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदिश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.