सर्वोत्तम यश मिळवण्यावर माझा भर असेल : आनंद

0

चेन्नई । झुरिच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळवण्यावर माझा भर असेल.कारकीर्दीत कधी कधी विजयासोबत अपयशासही सामोरे जावे लागत असते. अर्थात अपयशाबाबत कोणतेही मानसिक दडपण न घेता यंदाच्या विविध स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करण्याची मला खात्री आहे, असे माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सांगितले.

आनंद हा यंदा जागतिक स्तरावरील पाच स्पर्धा जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भाग घेणार आहे. हरीकृष्णने जागतिक मानांकनांत पहिल्या 50 क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्याने खूपच नेत्रदीपक प्रगती केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणार्‍या पात्रता स्पर्धेत हरी चांगले यश मिळवेल अशी मला आशा आहे. बी.अधिबानचीही झेप उत्तुंग होत चालली आहे. कोरस स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले.