सर्वानीच आपल्या घरापासूनच स्त्रियांना समतेची वागणूक द्या

0

प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांचे प्रतिपादन
पौर्णिमा उत्सवनिमित्त व्याख्यान
राजमाता रमाई मंच, कास्ट्राईब शिक्षक संघटनातर्फे आयोजन
शहादा – विषमतावादी ब्राह्मणी संस्कृतीने स्त्रियांना चूल व मूल एवढ्याच चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न केला. मनुस्मृतिने तर शूद्रांपेक्षा हिन दर्जा देत स्वातंत्र्य नाकारले. मात्र तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बुद्ध धम्मच्या माध्यमातून केलेल्या समतेच्या विचारातूनच स्त्री स्वातंत्र्याचा विचार उदयास आला. यामुळे धम्म आणि डॉ.बाबसाहेबांची विचार धारा मानणाऱ्या सर्वानीच आपल्या घरापासूनच स्त्रियांना समतेची वागणूक दिली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी केले. शहादा येथील राजमाता रमाई मंच, कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिवृक्ष परिसरात पौर्णिमा उत्सव व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, धम्ममित्र सुभाष जाधव, बांधकाम सभापती उषा कुवर, नगरसेवक नाना निकुंभ, रमाई महिला मंचाच्या अलका जोंधळे, दिपमाला नगराळे, कविता कुवर, मंजुषा गुलाले, उषा निकुंभ, नीता ब्राम्हणे यांच्याहस्ते आदर्शांचे पूजन करण्यात आले. यानंतर धम्ममित्र सुभाष जाधव, प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी त्रिशरणं व पंचशील ग्रहण करण्यास विनंती केली. यानंतर प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, धम्ममित्र जाधव, व मान्यवरांचे वैशाली केदारे, मनीषा साळवे, राजेंद्र गुलाले, संतोष साळवे, किशोर निकुंभ, नाजूकराव इंगळे, प्रदीप केदारे, सुधाकर मोरे, जयवंता निकुंभे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धम्मसहलीचे अनुभव कथनात आत्माराम इदंवे, श्रद्धा पगारे-मोरे यांनी दर्शन व धम्मबाबतचे विशेष सांगितले. यानंतर प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी सुमारे दीड तास धम्म व सामाजिक क्रांती, महापुरुषांची विचारधारा याबाबत प्रभावी भाष्य करीत मंत्रमुग्ध केले. यानंतर पौणिमेनिमित्त सर्वाना खिरदान देण्यात आले. प्रा. नेत्रदीपक कुवर व परिवाराने स्मृतिशेष बौद्धाचार्य किशोर कुवर यांच्या स्मृतीत १००० रूपये धम्मदान दिले.यांनी कार्यक्रमाचे अभारप्रदर्शन स्वाती फुलझेले, प्रास्ताविक व सूत्र संचालन विष्णू जोंधळे यांनी केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना बैसाणे, विजया बैसणे, विजया पाटोळे, गौरी पाटोळे, योगीराज जोंधळे, विश्वजित जोंधळे, अनिल शिरसाठ, सुनिल शिरसाठ नारायण सामुद्रे, मंगला निकम, इंगळे मॅडम, प्रज्ञा बिरारे, सोनाली गुलाले, श्रावस्ती मोेरे, सुषमा भामरे, सोना गुलाले, सुमित गुलाले, हृषिकेश शिरसाठ, सुरेखा आगळे आशा निकुंभे आदींनी सहकार्य केले.