सर्वसामान्य जनतेला ‘शॉक’; वीजबिल माफी मिळणार नाही

0

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल कमी कमी करण्याची मागणी होत होती, दिवाळीनंतर वीजबिल कमी होईल अशी अपेक्षा राज्यातील सर्व सामान्य जनतेला होती, मात्र जनतेच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. कुठलीही वीजबिल माफ केली जाणार नसल्याचे आदेश ऊर्जा विभागाने काढले असून महावितरणला वसुलीचे आदेश दिले आहे. या आदेशाने सरकारने सर्व सामान्य जनतेला शॉक दिला आहे. सरकारच्या या आदेशावरून पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जी वीजबिल वापरली आहे ती भरावीच लागेल, राज्य सरकारची आर्थिक स्थिती देखील अवघड असल्याचे सांगितले.

तक्रारदर ग्राहकांचे मीटर तपासले जातील, कोणत्याही ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाणार नाही असेही स्पष्टीकरण ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहे.  कोरोनामुळे राज्यातील जनतेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक सरकारने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र वीजबिलात कोणत्याही प्रकारची सूट देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हा मोठा ‘शॉक’ आहे.

वीजबिलात सूट देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाले, विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. मात्र त्याला यश आलेले नाही.

Copy