सराईत गुन्हेगाराला अटक;  दोन पिस्तूल, काडतुसे जप्त

0
कासारवाडी दर्ग्याजवळ केली कारवाई
पिंपरी-चिंचवड : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कासारवाडी मधील दर्ग्याजवळ गुरुवारी केली. केविन जॉर्ज अँथोनी (वय 23, रा. ग्लॉसम गोरिया अपार्टमेंट, मोरया पार्क, विल्यमनगर, पिंपळे गुरव) असे गुन्हेगाराचे नाव आहे.
मध्यप्रदेशमधून आणली पिस्तुल
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळाली की, एक इसम कासारवाडी येथील दर्ग्याशेजारी असलेल्या भंगारच्या दुकानासमोर थांबला आहे. त्याच्याजवळ पिस्तूल असून तो ते पिस्तूल विक्रीसाठी आला आहे. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या भागात सापळा रचून केविन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तूल खोचलेले आढळून आले. त्यामध्ये तीन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
सात दिवसांची कोठडी
त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्याला 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडून माहिती मिळाली की, त्याच्याकडे आणखी एक पिस्तूल असून ते त्याच्या घरी आहे. पोलिसांनी घरून ते पिस्तूल जप्त केले. केविन याने ही दोन्ही पिस्तुले आणि काडतुसे मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणली असल्याचे मान्य केले. केविन सांगवी पोलिसांच्या रोकोर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तीन शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, साहाय्य पोलीस निरीक्षक गणेश पाटील, दीपाली मरळे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, राजू केदारी, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, स्वप्नील शिंदे यांच्या पथकाने केली.
Copy