सरस्वती नगरात भगवान दत्तात्रय पादुकांची स्थापना

0

भुसावळ । येथील जामनेर रस्त्यावरील केशर नगर समोर असलेल्या सरस्वती नगर येथे दत्तात्रय, गणेश मुर्ती तसेच श्री दत्तात्रय पादूकांची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. यात दुपारी 3 वाजता कलशयात्रा व मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. ही कलश यात्रा डिगंबर नगर पासून ग्रीन प्लाझा कडून नियोजित गजानन महाराज मंदिरामागुन रामानंद नगर, हनुमान नगरमार्गे सरस्वती नगर मध्ये काढण्यात आली.

यामध्ये प्रार्याचत संकल्प, प्रधान संकल्प, गणेश पुजन, पुण्याह वाचन, मातृका पुजन, नांदीश्राध्द, आचार्य पुजन, देवता, अग्नि स्थापन, मुर्ती संस्कार, जलाधिवास, धान्यावास, ग्रहयज्ञ, शयनधिवास व त्यानंतर आरती आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.

गुरूवार 9 रोजी श्री मुर्ती स्थिरीकरण, प्राणप्रतिष्ठा, महामस्तकाभिषेक, बलीदान पुुर्णाहुती व आरती आदी धार्मिक कार्यक्रम माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाप्रसाद वितरण होणार आहे. यशस्वीतेसाठी तर रविंद्र महाजन, एम.के. पाटील, अरूण चौधरी, शंकर लोडके व डॉ.ज्ञानदेव बेंडाळे यांचे सहकार्य लाभत आहे.