सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

0

जळगाव: जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २८ आणि २९ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याची जबाबदारी प्रांताधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे तर इतर सर्व संवर्गातील सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार जाहीर करणार आहेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

Copy