सरकार ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये; फारकाळ टिकणार नाही

0

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार हे तीन इंजिन असलेली रेल्वे असून यात समन्वय नाही. मुख्यमंत्री-मंत्री यांच्यात समन्वय नाही हे अनेकदा उघड झाले आहे असे आरोप अनेकदा झाले. त्यातच आता राज्याचे स्टेअरिंग कोणाच्या हातात? हा प्रश्न विचारला जातो आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्याचे स्टेअरिंग कोणाच्या हातात? हा तर संशोधनाचा विषय आहे. स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात कि अजितदादांच्या हातात हे त्यांनीच ठरावे असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. एबीपी माझ्या वृत्तवाहिनीच्या “माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन” या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे सरकार टिकणार का? या प्रश्नावर त्यांनी हे सरकार ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे आहे. जसे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे नाते फारकाळ टीकत नाही तसे हे सरकार देखील फारकाळ टिकणार नाही. त्यांच्या अंतर्गत कुरघोडीमुळेच हे सरकार जाणार आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय क्षमतेचा अभाव आहे. ते थांबून थांबून निर्णय घेत आहे. त्यांच्यामुळेच राज्यात अनेक स्वयंमघोषित मुख्यमंत्री तयार झालेत, सध्या अनेक स्वयंमघोषित मुख्यमंत्री आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात तीन इंजिनचे सरकार आहे. रेल्वेला मागे आणि पुढे असे दोनच इंजिन असतात, मात्र या सरकारला तीन इंजिन आहे. एक पुढे- एक मागे आणि एक मधोमध असे तीन इंजिन आहे. जो तो पाहिजे तिकडे ओढतो आहे या शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Copy