सरकारने शेतीविरोधी धोरण बदलण्याची आवश्यकता

0

बोदवड । शेतकरी सरकारच्या विरोधी धोरणामुळेच कर्जबाजारी होवून आत्महत्या करीत आहे. सरकारने गव्हावरील आयात शुल्क शून्य केल्यामुळे या हंगामात परदेशी गव्हाची आवक वाढून देशातील गहू कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करतील. 1980 पासून जेवढे अतिरेकी हल्ले झाले त्यात मृत्यू पडलेल्यांची संख्या पाहता त्यांच्या कितीतरी पटींनी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यामुळे सरकारने शेती विरोधी धोरण बदलून शरद जोशी प्लॅन जागू करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी केले.

यांची होती उपस्थिती
येथील शेतकरी सभागृहात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. त्यांच्यासोबत पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सिमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत भदाणे, स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, भिमराव पाटील, राजेंद्र चौधरी, संतोष पाटील, पंडीतराव अटाळे, बोदवड तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, डॉ. डी.एस. पाटील, अशरफ, शरद ठाकूर, नाना पाटील, नितीन पाटील, श्रीकृष्ण तांगडेे, अशोक वाघ, दिपक पाटील, रघुनाथ चौधरी, सुनिल बोदडे, रतनसिंग पाटील, गोपीचंद सुरवाडे, नारायण वाघ, रमेश बनकर, संतोष पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड माजी उपसरपंच सईद बागवान होते.