समान निधीच्या ठरावावरून जिल्हा परिषदेची सभा वादळी

0

‘त्यांना बोंबंलुद्या’ ; ‘राजधर्म’ शब्दावरून वादंग : राष्ट्रगीतावरून गोंधळ    

जळगाव- समाननिधी वाटपावरून आजची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. अनेक सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनी या ठरवाला विरोध दर्शविला. यातच ’अधक्ष्यांच्या काळात समान निधी मिळाला असेल तर आपणही देऊ, त्यांना बोंब्लुद्या. असा शब्द प्रयोग अधक्ष्या उज्वला पाटील यांनी करताच गोंधळ वाढला व पल्लवी सावकारे यांच्यासह महिला सदस्यांनी व्यसपीठाजवळ एकत्र जमून अध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी केली. या ठरावाला विरोध करणार्‍यांमध्ये 16 भाजपचे सदस्य असल्याची माहिती आहे.  सदस्य नाना महाजन, जयपाल बोडदे, शशिकांत साळुंखे यांनी आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान, 49 सदस्यांनी विरोध केल्यामुळे 120 कोटींच्या कामांना ब्रेक लागणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिक्षक बदली, शिक्षकांचे समायोजन, आरोग्यासह सिंचनाच्या कामांवरून आजची सभा चांगलीच वादळी ठरली.

दरम्यान, आजच्या सभेची सुरुवातच वादळी ठरली. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीताचा उल्लेख करून वंदे मातरम म्हणण्यात आल्याने सदस्य नाना महाजन यांनी हा मुद्दा उपस्थित करून यावर आक्षेप नोंदविला व राष्ट्रगाण व राष्ट्रगीत यातील फरक समजून घ्यावा , असे सांगितले. समान निधी वाटपावरून गोंधळ झाला. सत्ताधारी अनेक सदस्यांसह विरोधक अश्या 48 सदस्यांनी समाननिधी वाटपाच्या विषयाला विरोध दर्शविला. यासंदर्भात ठराव नामंजूर करण्याची मागणी केली, यावरून बराच वेळ गोंधळ सुरू होता. या यानंतर उपमुख्यकार्यकरी अधिकारी आखलाडे यांनी मतदान घेतले 48 सदस्यांनी विरोध केला. यानंतर मंजूर व नामंजूर यावरूनच बराच वेळ गोंधळ सूरु होता, आपल्या सदस्यांनी विरोध करू नये अशी भूमिका शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी मांडली, आपण नंतर बैठक घेऊन यातून मार्ग काढू असे प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले,

राजधर्म शब्दावरून शाब्दीक चकमक
ठराव नामंजुरीच्या मतदानंतर मधूकर काटे बोलायला उभे राहिले , आखलाडे यांनी जी मतदानाची प्रक्रिया घेतली त्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला, अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय अशी प्रक्रिया काशी पार पाडली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, विरोध करणे हा विरोधकांचा राजधर्म आहे, असे त्यांनी म्हणताच विरोधी सदस्य आक्रमक झाले, या शब्दावरून शशीकांत साळुंखे व मधूकर काटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भूमिका मांडत ठरवाला विरोध दर्शविला.

Copy