समाज सुरक्षित राहण्यासाठी पोलीस सुदृढ असावा; विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे

0

धुळे- समाजातील नागरिकांची सुरक्षा आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यांने एकतरी खेळ किंवा व्यायाम नियमित करावा. व्यक्तीगत जीवनात पोलीस आणि नागरिकांनी सुध्दा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. समाजस्वास्थ निकोप ठेवण्यासाठी पोलीस विभाग सक्षम व सुदृढ असणे आवश्यक आहे. असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोरजे यांनी व्यक्त केले. धुळे येथे पोलीस मैदानावर आयोजित 31 वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षिक विश्वास पांढरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन यांच्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन
धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी स्पर्धांची माहिती दिली. ते म्हणाले की, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विविध सण-उत्सवांचा काळ, धुळ्यातील स्थिती लक्ष्यात घेता 31 वी नाशिक परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. कोणतीही विश्रांती न घेता. धुळे टीमने स्पर्धेचे आयोजन केले. पाच जिल्ह्यातील 500 स्पर्धकांनी 36 क्रिडा प्रकारात सहभाग नोंदविला. त्यात हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅसकेट बॉल, धावण्याची स्पर्धा आदी विविध स्पर्धांचा सहभाग होता. अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे व टीमने कमी वेळात चांगले नियोजन केले. असे जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले.

जळगाव प्रथम स्थानी
बक्षिस वितरण सोहळा सुरु होण्यापूर्वी स्पर्धक पोलीस कर्मचार्‍यांनी संचलन करुन मानवंदना दिली. यावेळी गुजराथ येथील आदिवासी कलाकारांनी आदिवासी नृत्यू सादर केले. 200 किमी. महिला आणि पुरूषांचे धावण्याचे अंतिम सामने यावेळी रंगले. रात्री उशिरापर्यंत बक्षिस वितरण कार्यक्रम सुरु होता. स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. कबड्डी स्पर्धेत महिलांच्या जळगाव संघाने बाजी मारली. पुरुष संघात अहमदनगर संघाने बाजी मारली. हॉलीबॉल स्पर्धेत जळगाव संघाने विजयी मिळविला. बॉस्केटबॉल स्पर्धेत नंदुरबार संघाने बाजी मारली तर व्दितीय क्रमांकावर नाशिक संघाने जागा राखली. खो-खो स्पर्धेत धुळे संघाने विजयी प्राप्त केला तर अहमदनगर संघ दुसर्‍या क्रमांकावर होता. हॉकी स्पर्धेत पुरुष गटात नाशिक ग्रामिण संघाने बाजी मारली. फुटबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकविला. नाशिक जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर होता. हॅडबॉल स्पर्धेत नाशिक शहराने प्रथम तर व्दितीय क्रमांकावर नंदूरबार जिल्हा संघ विजयी झाला.

100 मिटर धावणे स्पर्धेत जळगावचा अमोल जाधव याने प्रथम क्रमांक मिळविला. तर नगरचा अविनाश शिरसाठ दुसर्‍यांकावर विजयी झाला. 100 मिटर धावणे सांघिक स्पर्धेत जळगाव संघाने बाजी मारली. दुसर्‍या स्थानावर नाशिक शहर होते. 100 मिटर धावणे महिलांच्या सांघिक स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला. धुळे संघा दुसर्‍या क्रमांकावर होता. 1 हजार मिटीर धावणे स्पर्धेत नाशिक ग्रामिणने प्रथम तर नाशिक शहराने व्दितीय क्रमांक मिळविला. 42 किलो मिटर धावणे स्पर्धेत नाशिक ग्रामिणचा संजय अहिरे यांनी प्रथम क्रमांक पटकविला. तर नाशिकचा विक्रम तासरे यानी व्दितीय क्रमांक मिळविला.

उत्कृष्ठ खेळाडू म्हणून नंदूरबारचा पोलीस कर्मचारी भुषण चित्ते यांना मान मिळाला. महिला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून नाशिकची योगिता वाघ यांनी मान मिळाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Copy