समाजाचा विकास अभियंत्यांच्या हाती- प्रा.हरीश भंगाळे

0

जळगाव: समाज विकास हा प्रथमदर्शी ठेवून अभियंत्याने काम करणे देश हिताचे आहे. शासकीय योजनांची व प्रकल्पांची खरी अंमलबजावणी करण्याचे कार्य अभियंत्याच्या हाती असते. शहरापासून ते गाव खेड्या पर्यंत विकासाची धुरा आपल्याकडे असते. त्यामुळे काम करताना कामाची जबाबदारी, सत्यता व प्रामाणिकता राखणे आपल्या पदासाठी न्याय राहील. यामुळे उत्तम अभियंता तुम्ही होऊ शकतात असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा.हरीश भंगाळे यांनी व्यक्त केले.

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात महान अभियंता व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिनी पदवी व डिप्लोमा आयोजित अभियंता दिनानिमित्त ते बोलत होते. प्रसंगी विभाग प्रमुख प्रा.राकेश तिवारी, प्रा.राजेश दहिभाते, प्रा.विजय बोरसे, प्रा.सोनल पाटील, प्रा.भाग्यश्री पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अभियंता म्हणून काम करताना देशभक्ती जोपासा. दूरदृष्टी ठेवा, परीक्षण करा आणि निसर्गाकडे उघड्या डोळ्यांनी पहा तेव्हाच तुम्ही अभियंता म्हणून जिवंत राहाल. नवीन बदल करण्याची क्षमता आपल्यात आहे परंतु गरज आहे आपल्या धाडसाची, कोणत्याही शाखेचा अभियंता हा अभियांतच असतो मात्र त्यांची कामाची जबाबदारी व स्वरूप वेगळे असते. एखाद्या संशोधकाने संशोधन केल्यानंतर त्यावर शास्रीय पद्धती नुसार सूचकपणे काम हा अभियंता करत असतो. देशाच्या विकासात विकास रथाचा सारथी म्हणून तुम्ही काम पाहता याची कल्पना आपल्याला हवी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाविद्यालयातील योगा क्लब, लेस्ट टॉक क्लब, टोस्ट मास्टर क्लब, ड्रामा क्लब, नृत्य क्लब, संगीत क्लब अशा विविध मिळून सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून सिव्हील, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल, संगणक, आयटी, इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन या विभागातील विद्यार्थ्यांनी काम पहिले. प्रसंगी सूत्रसंचालन प्रियांका इंगळे, भूषण कुलकर्णी व आभार समीक्षा शर्मा सिद्धार्थ जैन यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.