समाजसेवी आदर्श व्यक्तिमत्वाचा सत्कार

0

जळगाव । पाळधी शिवारातील त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्रिमूर्ती फाऊंडेशनची स्थापना 5 वर्षापूर्वी करण्यात आली. फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजीक बांधीलकीची जाणीव ठेवून समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येत असते. यावर्षी देखील सेवाभावी वृत्तीने सामाजिक कार्यकरीत असलेल्या डॉक्टर, आदर्श शिक्षक, आदर्श शेतकरी तसेच क्षेत्रातील समाजसेवी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याच्या निर्णय त्रिमूर्ती फाऊंडेशनने घेतला आहे. त्याअनुषंगाने रविवारी 26 फेबु्रवारी रोजी त्रिमूर्ती सन्मान 2017 या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळी पाळधी येथील हॉटेल गोविद समोरील त्रिमूर्ती तंत्रनिकेतनच्या मैदानात करण्यात आले आहे.

यांचा होणार कार्यक्रमात सन्मान
डॉ.उल्हास कडूसकर, डॉ.सुनिल नाहाटा, डॉ.उत्तम चौधरी, एम.व्ही.पाटील, किरण पाटील, रामचंद्र पाटील, अशोक पाटील, मुकुंद गोसावी, सामाजिक कार्यकर्ते, एस.आर.महाजन आदींना यांना जीवन गौरव सन्मानाने सन्मानीत करण्यात येणार आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा होणार आहे. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, उमवी बीसीयुडी संचालक डॉ.पी.पी.माहूलीकर, नगरसेवक विष्णु भंगाळे, डॉ.ए.सी.पाटील, राजेश मुणोत आदी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा त्रिमूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविली आहे. उपस्थितीचे आवाहन त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित पाटील, सचिव सुनिल पाटील, संचालक मनोज पाटील यांनी केले आहे.