समांतर रस्ते व एमआयडीसीला पाणी देण्याचा विषय महासभेत गाजण्याची शक्यता

0

जळगाव । अद्ययावत फिश मार्केटसाठी जागा मिळत नसल्याचे तकलादू कारण महापालिका प्रशासनाने पुढ केले आहे. हा प्रस्ताव रद्द करण्याचा शिफारस असलेला ठराव उद्या मंगळवारी दि.28 होणार्‍या महाभसभेसमोर ठेवला जाणार आहे. यासह समातंर रस्ते व एमआयडीसीला पाणी देण्याचा विषय देखील गाजण्याची शक्यता आहे. जळगाव मनपाची महासभा मंगळवारी दि. 28 सकाळी 11 वाजता सतरा मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. तीन महिन्यांच्या खंडानंतर ही सभा होत आहे. त्यामुळे या सभेच्या विषयपत्रिकेवर 13 प्रशासकीय तर 8 अशासकीय विषयांचा समावेश आहे.

प्रस्ताव रद्द करण्याचा प्रशासनाची भुमिका
जळगाव महापालिकेने महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळांकडे शहरात फिश मार्केटसाठी प्रस्ताव सादर केला होता. अत्याधुनिक मासळी मार्केटसाठी राज्य मत्सोद्योग महामंडळाने महापालिकेस मासळी मार्केटच्या आराखड्यास मंजुरी दिली होती. त्यासाठी सुमारे 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला . जागा मिळत नसल्याने हा प्रस्ताव रद्द केलेलाच बरा, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तसा प्रस्ताव महासभेच्या विषयपत्रिकेवर घेतला आहे.

महासभेत या विषयांवर करण्यात येणार चर्चा
महासभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळेधारकांची मुदतवाढ व भाडेपट्टाचे दर नविन मिळणेबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे. या विषयासह औद्योगीक वसाहतील क्षेत्रासाठी मनपाकडून करण्यात येणार्या पाणी पुरवठाबाबत आलेल्या प्रस्तावावर चर्चा करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग व वृक्ष अनामत रक्कम परत करण्यासाठी आलेला प्रस्तावर निर्णय घेणे, एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत करारावर असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना पुर्ननियुक्ती करण्यासाठी निर्णय घेणे, मनपाच्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे व त्याची दैनंदिन साफसफाई होत नसल्याने त्याची दुरुस्ती करुन ‘पे ऍण्ड युज’ या भाडेतत्वावर चालविण्यास देणे, रेल्वे लाईन जवळील समांतर मधील डिपीरोडच्या कडेला गटारींचे बांधकांम करणार्या मक्तेदाराची मनपाकडे असलेली अमानत रक्कम मक्तेदारास मिळावी यावर देखील चर्चा होणार आहे. तसेच दिवाबत्ती व त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यार्या संबंधित कंपनीशी करार करण्यासाठी मनपाकडून तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर निर्णय घेणे, मनपाच्या अपंग कल्याण कृती आराखड्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

वारसांना मदत मिळावी
जिल्हा रुग्णालयात वाळलेल्या वृक्षाची फांदी पडून तुकारामवाडीतील संगीता सोनवणे या महिलेचा मृत्यु झाला होता. या महिलेल्या वारसांना मनपाकडून मदत मिळावी यासाठी रिपाईतर्फे मागणी करण्यात आली होती. या विषयावर महासभेत चर्चा होणार आहे.