सबळपुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

0

जळगाव : ट्रकच्या धडकेत तवेरातील तीन जण जखमी झाल्याची घटना 10 डिसेंबर 2012 रोजी येथील अजिंठा चौफुली जवळ घडली होती़ या घटनेतील संशयीतास आज 27 डिसेंबर रोजी न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले़ अजिंठा चौफुली जवळ उभ्या असलेल्या तवेरा गाडी क्रमांक (एमएच़12 एटी़1247) ला मागुन येणार्‍या ट्रक क्रमांक(जीजे़6़झेड़9126) वरील चालक परमेश्वर सिताराम निकाळजे(36) रा. ़वझर, अघाव ता़.लोणार ज़ि बुलढाणा, याने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून तवेरा गाडीस धडक दिली होती़ या अपघातात कारमधील गणेश बारी व अंन्य दोन जण जखमी झाले होते़ या घटनेसंदर्भात गणेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत ट्रक चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यासंदर्भात आज न्यायालयात कामकाज झाले़ न्यायालयाने संशयीत परमेश्वर निकाळजे याची सबळपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ संशयीतातर्फे अ‍ॅड.महेश दंडगव्हाळ तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी तर न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज झाले़