सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल आज निकाल

0

नवी दिल्ली: केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही.

सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रम्हचारी असल्याने या मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही, अशी मंदिर प्रशासनाची भूमिका आहे. मंदिराकडून महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यामुळे न्यायालयाने धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली आहे.

केरळच्या सबरीमाला मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी आहेत, अशी श्रद्धा आहे. याशिवाय सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.