सबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

0

नवी दिल्ली: केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता आजच्या कोर्टाच्या निर्णयामुळे मंदिरात सर्व महिलांना प्रवेशाची दारे खुली झाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली.

पूजा करण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे आणि लैंगिक आधारावर भेदभाव करता येत नाही असे म्हणत भारताचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी सबरीमाला मंदिराचे दार सर्व महिलांसाठी खुले असल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांसाठी मोठा मानला जात आहे. महिलांना खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे आणि स्त्री-पुरुष समानता येणार आहे.

Copy