सफाई कामगार संघटनेतर्फे महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार

0

जळगाव: मेहतर वाल्मीक समाज व सफाई कामगार संघटनेतर्फे नवनिर्वाचित महापौर सिमा भाळे व उपमहापौर अश्विन सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला़ हा सत्कार कार्यक्रम नुकताच श्रीनवल कॉलनीतील समजमंदिरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते़ कार्यक्रमाची सुरूवात रामदेवजी बाबा प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर महापौर व उपमहापौर यांच्या सत्कार करण्यात आल्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजपाचे मनपा गटनेते भगत बालाणी, नवनिर्वाचित नगरसेवक मनोज अहुजा, रेशमाताई काळे, रजणीताई अत्तरदे, चेतन सनकत यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ यावेळी नगरसेवक किशोर सोनवणे, ग़स़सोसायटीचे चेअरमन विलास नेरकर, दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी, सामाजिक कार्यकर्त्ते सुरेश जाधवाणी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी मेहतर समाजाच्या व सफाई कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात महापौर सिमा भोळे यांना देण्यात आले़ त्यात सफाई कामगांराची भरती करावी, सफाई कामगारांची पदे शासानाने व्यापगत केली आहे़ ती पदे पुनर्जीवीत करण्यासाठी मनपा महासभेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, श्रीनवल कॉलनतील समाज मंदिराची दुरूस्ती व्हावी, ममुराबाद रस्त्यावर जुने शौलायल तोडण्यात यावे, समाज व सफाई कामगारांचे नेते कै़ वासुदेवराव चांगरे यांच्या स्मारकासाठी जागा मंजुर करणे यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आले़ तर या मागण्यांवर मनपा सभागृहात योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कैलास सोनवणे व भगत बालाणी यांनी दिले़ तसेच समाजमंदिराचे आमदार निधींतून दुरूस्ती करण्याचे आश्वासन आमदार भोळे यांनी दिले़.
कार्यक्रमाला मेहतर वाल्मीक समाजाचे सरपंच वसंतराव चांगरे, दिलीप चांगरे, अमरसिंग रानवे, जयप्रकाश चांगरे, संजय सनकत, पंडीत चांगरे, जगदीश चांगरे, शिवाजी बागडे, शशी ढंढोरे, अरूण चांगरे, अजय चांगरे, किशोर हंसकर, संनी चांगरे, गोपी चिरावंडे, अजस सरपटे, अजय हसंकर, पूनम पवार, राकेश सनकत, प्रमोद गोयर, कपील गोयर आदी उपस्थित होते.

Copy