सन्मानपूर्वक जागा दिल्यास काँग्रेससोबत जाणार

0

रावेर : तालुक्यात काँग्रेस पक्षाने सन्मानपूर्ण जागा दिल्या तरच आघाडी होणार राष्ट्रवादी पक्षाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे सर्वच्या-सर्व जागा आपण नक्की जिंकु तसेच येणार्‍या नऊ तारखेला नोट बंदीच्या निषेधार्थ मोर्चा आयोजित केला आहे. यास यशस्वी करण्याचे आवाहन माजी आमदार अरूण पाटील यांनी केले. रावेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक येथील कृषि उपन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली. सहा गट व बारा गणांसाठी ही बैठक होती. तसेच वेगवेगळ्या गटातून व गणातून इच्छुक उमेदवारांनीही मुलाखती दिल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, तालुकाध्यक्ष सोपान पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, युवती तालुकाध्यक्ष माधुरी पाटील, सावदा नगरसेवक राजेश वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे संचालक कृष्णराज पाटील, निळकंठ चौधरी, योगेश पाटील, शेतकी संघ संचालक पी.आर. पाटील, प्रकाश पाटील, आत्माराम कोळी, किशोर पाटील, लक्ष्मण मोपरी, सचिन पाटील, सुनील कोंडे, मंदार पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र वानखेडे, पांडुरंग पाटील, महेंद्र बगारे, संजय पाटील, एल.डी. निकम उपस्थित होते. सूत्रसंचलन युवक तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले.